पदवीधरसाठी १० जणांची उमेदवारी दाखल; ९७ जणांनी नेले १७४ अर्ज

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) मराठवाड़ा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यासोबतच अर्ज नेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. शनिवारी (दि. ३) एकाच दिवसात १० इच्छुकांनी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले. आता उमेदवारी दाखल करणाऱ्यांची संख्या १२ झाली असून चार दिवसांत ९७ इच्छुकांनी १७४ अर्ज नेले आहेत. उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. :
आतापर्यंत उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांची संख्या ही २७ झाली असून अर्जाची संख्या १७५ झाली आहे. तसेच शुक्रवारी दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर शनिवारी एकाच दिवशी १० जणांनी
यांनी केले अर्ज दाखल
आम आदमी पार्टीकडून अकील अहमद शेख, भीमसेनेकडून श्रीधर साळवे तर कृष्णा पवार, संजीवनी टेकाळे, नामदेव वाघमोडे, अॅड. अंबादास जाधव, अविनाश गोरे, रमेश कसारे पाटील यांनी अपक्ष तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून शेख अब्दुल मलिक अब्दुल खुदुस, स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने संजीवनी मदनराव टेकाळे यांनी अर्ज दाखल केले.
दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले. आता उमेदवारी दाखल करणाऱ्या इच्छुकांची संख्या आता १२ झाली आहे. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions